बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचे चक्र सुरुच आहे. गुरुवारी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ हजाराच्यावर गेली. यासह राज्यात गुरुवारी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,४९,४९६ वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात गुरुवारी ३५,०२४ नवीन रुग्ण सापडले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णात घट झाली आहे. गुरुवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७० जणांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार गुरुवारपर्यंत १४,१४२ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. गुरुवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १५,३०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून गुरुवारी सकारात्मक दर १९.९२ टक्के होता.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी १९,६३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ६,१२८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. तर २४ तासात १४३ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना परिस्थिती चिंताजन आहे.









