बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा वेग वाढतच चालला आहे. राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असू शकते असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकारने तयारी ठेवली आहे. राज्यात सलग कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या २,७०० च्या वर गेली आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचा वेग वाढल्याने राज्यात २,७९२ रुग्णांची भर पडली. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १३,८४९ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात सोमवारी २,७९२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हंटले आहे. तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून १,९६४ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. सोमवारी कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९,८९,८०४ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,५३,४६१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तसेच कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १२,५२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कोरोनावर नियंत्रण नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कमही वाढवली आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात १,७४२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या १६,२५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









