ऑनलाईन टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात कहर केला. आता कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे. तरीही दैनंदिन आकडेवारीमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहे. राज्यात आज ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर १४५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ४ हजार ७८० करोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आजपर्यंत राज्यात ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तर सध्या एकूण ५३ हजार १८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील काही दिवसांमध्ये राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








