बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. राज्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट आल्यास सरकारही कोरोनावर मात करण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी सरकारने तसे आदेशही दिले आहेत. दरम्यान सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या १,४०० च्या वर गेली. राज्यातसोमवारी १,४४५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, सोमवारी राज्यात ६६१ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. सोमवारी संक्रमित झालेल्यांपैकी दहा जणांचा मृत्यू झाला.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कडक नियमावली राबवित आहे. अनेक कार्यक्रमांवर मर्यादा आणली आहे. शहरी जिल्ह्यात सोमवारी ८८६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे









