प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे काल बुधवारी कोरोनामुळे 2 जणांचा अंत झाल्याने एकूण मृतांचा आकडा 737 वर पोहोचला आहे. नवीन 97 कोरोना रुग्ण सापडले असून 114 जण बरे होऊन घरी परतले आहेत तर संशयित रुग्ण म्हणून 37 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून 70 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 931 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण असून ते विविध इस्पितळात कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकुण 50981 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 49313 जणांना कोरोनामुळे मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली-17, सांखळी- 18, पेडणे-29, वाळपई-6, म्हापसा- 32 पणजी-74, हळदोणा-10, बेतकी-17, कांदोळी-45, कासारवर्णे-4, कोलवाळ-9, खोर्ली-36, चिंबल-49, शिवोली-26, पर्वरी-57, मये-4, कुडचडे- 27, काणकोण-28, मडगांव-87, वास्को- 42, बाळ्ळी- 11, कासावली-31, चिंचिणी-7, कुठ्ठाळी-34, कुडतरी-24, लोटली- 14, मडकई- 17, केपे- 22, सांगे-18, शिरोडा-40, धारबांदोडा-13, फोंडा- 60, नावेली-20.
- 30 डिसेंबरपर्यंतचे एकुण रुग्ण- 50981
- बरे झालेले रुग्ण- 49313
- सक्रिय कोरोना रुग्ण- 931
- 30 डिसेंबरचे नवीन रुग्ण- 97
- बरे झालेले रुग्ण- 114
- कोरोना बळी- 2
- आतापर्यंतचे एकुण बळी- 737









