ऑनलाईन टीम
राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच मृतांचा आकडाही चिंताजनक रित्या वाढत आहे. सध्या राज्यात 15 दिवसांची संचारबंदी सुरू असतानाही आज कोरोनाने 503 जणांचा बळी घेतला. तर गेल्या 24 तासांत 68 हजार 631 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात कोरोनाने मृत्यूचा दर 1.58 एवढा असून आजपर्यंत 60 हजार 473 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. आज दिवसभरात 45 हजार 654 जण कोरोनातून बरे झाले. तर आतापर्यंत 31 लाख 6 हजार 828 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळेराज्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 80.92 टक्के झाले आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय संघटनांचा कोरोना टास्क फोर्स स्थापन
Next Article शवविच्छेदनाच्या कापडासाठी`सीपीआर’मध्ये दिवसाही लूट








