सरकार स्वतः बेसावध असल्याने लोकांचा जीव धोक्मयात.
श्रावण व गणेश चतुर्थीपूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सरकारसमोर आवाहन.
डिचोली/प्रतिनिधी
देशात गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले होते. सदर व्हायरसची धास्ती घेऊन लोकांनी स्वतः लॉकडाउन पाळले, त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या फैलावावर रोख लागली होती. मात्र त्यानंतर सरकारने जिवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी म्हणून सीमा खुल्या केल्या तसेच राज्यात सरकारनेच विविध प्रकारची उदघाटने आणि कार्यक्रम केल्याने लोकांच्या मनातील भीती नष्ट झाली आणि लोकही सर्रास फिरू लागले. त्यामुळेच आज राज्यात कोरोनाचा संसंर्ग वाढला. या संपूर्ण परिस्थितीला सरकारच जबाबदार असून येत्या श्रावण म स आणि गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील हि परिस्थिती नियंत्रणात आणणे सरकारसमोर आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्य सरचिटणीस मिलींद गावस यांनी व्यक्त केली.
डिचोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलींद गावस बोलत होते. आजही लोक स्वतः आपापले गाव वस्ती लॉकडाउन करून स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत आहे. मागील लॉकडाउन हा लोकांमुळेच यशस्वी झाला होता. सरकारला मात्र लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. उलट मुख्यमंत्री गोव्यातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे सांगतात. हे दुर्दैवी असून एकेकाळी ग्रीन झोनमध्ये असलेल्या या राज्यात आज कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. हेही तितकेच संवेदनशील आहे. याची मुख्यमंत्र्यांनी ठेवावी. सरकारकडून या विषयी चांगली जागृती झालेली नसून केवळ दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक करण्यात आलेली आहे, असा आरोप मिलींद गावस यांंनी केला.
राज्यात कोरोनामुळे एक बळी गेल्याचे जाहिर करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्वप्रथम सदर मृत रूग्ण महिला असल्याचे जाहीर केले होते. तर नंतर चुकीची दुरूस्ती करताना सदर रूग्ण पुरूष असल्याचे सांगितले. यावरूनच सरकारच्या प्रत्येक माहितीत तफावत असल्याचे जाणून येते. त्यामुळे सरकारने आतापर्यंत लोकांना पुरविलेली माहितीही संशयाच्या घेऱयात येते. यापूर्वी संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूंबाबतही संशय निर्माण होतो. असेही मिलींद गावस यांनी म्हटले.
श्रावण व गणेश चतुर्थीपूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान.
दिल्लीतील एम्स् इस्पीतळाच्या संचालकांनी दावा केला होता की, पाऊस सुरू झाल्यानंतर वातावरण थंड होणार आणि या काळात कोरोनाचा फैलवा अधिक प्रमाणात होऊ शकतो. गोव्यात आत्ताच पावसाला प्रारंभ झालेला आहे. अजून पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू व्हायचा आहे. यावषी गणेश चतुर्थी ऑगस्ट महिन्यात आहे. त्यापूर्वी जुलै महिन्यापासून श्रावण मासाला प्रारंभ होतो. हे दिवस गोव्यातील लोकांसाठी चैतन्यमयी दिवस असतात. या काळात जर कोरोनाचा फैलाव वाढूच लागला आणि सरकार तो नियंत्रणात आणण्यास अपयशी ठरले तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यासाठीच येणाऱया श्रावण मासापूर्वी राज्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्याचे सरकारसमोर आव्हान आहे. त्यादृष्टीने सरकारने विचार करावा, अशी मागणी मिलींद गावस यांनी केली आहे.









