रेव्होल्युशनरी गोवाचे मनोज परब यांची हाक
प्रतिनिधी/ म्हापसा
सध्याचे सरकार हे स्थानिकांच्या विरोधात कार्यरत असल्यामुळे विधानसभेतील चाळीसही आमदारांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे. म्हापशाची बाजारपेठ परप्रांतियांच्या घशात गेली आहे. या सर्व गोष्टींवर एक नवीन क्रांती घडविण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयांनी सज्ज राहायला हवे, असे आवाहन रेव्होल्युशनरी गोवाचे मनोज परब यांनी केले. हणजूण-चिवार क्रीडा मैदानावर आयोजित रॅली व विराट सभेत ते बोलत होते. यावेळी रेव्होल्युशनरी गोवाने पुकारलेल्या हाकेला सुमारे आठ हजार जनसमुदाय उपस्थित होता. ‘पोगो’ बिल येत्या विधानसभेत मंजूर न झाल्यास राज्याच्या कानाकोपऱयात या विरोधात आवाज उठविण्याचा इशाराही यावेळी परब यांनी दिला.
गोव्यातील बाजारपेठा परप्रांतियांच्या घशात गेलेल्या आहेत. राज्यातील पर्यटन व्यवसाय तसेच खाण व्यवसाय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोवा स्वातंत्र्य़ानतर खुलेआम चारीबाजुंनी गोव्यात प्रवेश करणाऱया परप्रांतियांमुळे स्थानिकांचे जगणे कठीण होऊन बसलेले आहे. त्यांच्या अस्तित्वाचा तसेच अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यानेच स्थानिकांना खऱया अर्थाने मुक्त करण्यासाठीच रिव्ह?लशनरी गोवाची स्थापना करण्यात आल्याचे ,संस्थेचे प्रमुख मनोज परब यांनी हणजुणात सांगितले. रविवारी संध्याकाळी येथील चिवार- हणूजुणात रिव्ह?लिशनरी गोवा तर्फे आयोजित विराट सभेत परब बोलत होते. गोव्याचा आर्थिक कणा असलेला पर्यटन तसेच खाण उद्द?ग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोवा माईल्स या परप्रांतीय कंपनीला राज्यात आमंत्रित करून सरकारने स्था?निक टेक्सी चालकांचा पारंपरिक टेक्सी व्यवसाय डबघाईस आणून ठेवला आहे. सध्याचे सरकार हे स्था?निकांच्या विरोधात कार्यरत असल्यामुळे विधानसभेतील चाळीसही आमदारांना घरी पाठविण्याची वेळ आली असल्याचे आवाहन रिव्ह?लिशनरी गोवाचे प्रमुख मनोज परब यांनी हणजुणात विराट सभेत बोलतांना केले. म्हापशातील जगप्रसिद्ध बाजारपेठ पुर्णपणे परप्रांतीय व्यापार्यांच्या घशात गेली असून यासाठी जबाबदार असलेल्या स्थानिक नगरपालिकेला लवकरच याबाबतीत जाब विचारला जाणार असल्याचा इशाराही परब यांनी यावेळी बोलतांना दिला. मोपा विमानतळ हा राज्याच्या फायद्याचा नसल्यामुळे त्यामुळे स्थानिक लोका?ना त्यापासून काडीचाही कामधंदा मिळणार नसून याउलट जवळच्या महाराष्ट्र जिह्यातील लोकांचा तालुक्मयात वावर वाढणार असल्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. गोवा माईल्स ही परप्रांतीय कंपनी गोव्यात आणून सरकारने स्थानिकांची गळचेप केलेली असल्याने यापुढे हा प्रश्न गोवा रिव्ह?लिशन आपल्या हाती घेणार असल्याचे परब यांनी सांगितले. गोमंतकीय माणुस मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो गोमंतकीय म्हणून एकत्रित येणे आज काळाची गरज असून यागोष्टीला दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी उपस्थितांना निक्षुन सांगितले. गोव्याच्या काना कोपर्यात परप्रांतियांची एकगठ्ठा मते निर्माण करून स्था?निक जनतेला वार्यावर सोडून दिलेले आहे त्यामुळे विधानसभेतील चाळीसही आमदारांना घरी पाठविण्याची वेळ आली असल्याचे सांगतानाच आता नवीन क्रा?ती घडवुन आणण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने सज्ज राहाण्याचे आवाहन मनोज परब यांनी शेलटी सभेला उपस्थित विराट जधसमुदायाला केले. दरम्यान, यावेळी रिव्ह?लिशनरीचे गोव्याच्या विविध भागातून सभास्थानी आलेल्या अनेक कार्यककरत्यांनी परप्रांतीय लोकांमुळे स्था?निकांच्या दैनंदिन जीवनालर तसेच सामाजिक अवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्या भाषणात सांगितले. गोमंतकीय जनता देशाची शान इतर प्रदेशात जाऊन आपली माणसे त्यांच्या जमीनी हडप करत नसतात. अनैतिक प्रुत्ये करत नसतात. मात्र आपल्या कुकर्मांनी गोव्याची चौफेर इज्जत घालवणार्या परप्रांतीयांना वठणीवर आणण्याची हीच निर्णायक वेळ असल्याचे शेवटी मनोज परब यांनी सांगितले. …..यावेळी पुरुष तसेच महिला आणी तरुण वर्ग मोठय़ा संख्येने सभास्थानी उपस्थित होता. रिव्ह?लिशनरीच्या वतीने पर्सन आऑफ गोवन ओरिजीध या?वर मनोज परब यांनी सविस्तर भाष्य करीत येत्या विधानसभेत हे बील मंजूर न झाल्यास गोव्याच्या कानाकोपर्यात चळवळ पेटविण्याचा गर्भित इशारा शेवटी सरकारला दिला.









