प्रतिनिधी / सांगली
नाट्यगृहाचे चांगले व्यवस्थापन आणि देखभाल व्हावी, रसिक प्रेक्षकांना सांगली नाटके व करमणुकीचे कार्यक्रम पाहता यावेत या उद्देशाने राज्यभरातील सर्व 63 नाट्यगृहे एकाच छताखाली आणावीत. अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली. एका लग्नाची पुढची गोष्ट या 21 रोजी होणाऱ्या प्रयोगाच्या निमित्ताने ते सांगलीत आले होते. भावे नाट्य मंदिर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्राला नाट्य क्षेत्राची मोठी परंपरा असून राज्यातील सर्व नाट्यगृहाचे नियंत्रण एकाच छताखाली आल्यास त्यांची चांगले व्यवस्थापन राहील यासाठी राज्य शासनाने किमान 200 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा.त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी दामले यांनी यावेळी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








