बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकार प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे (पीएचसी) सुधारित करण्यासंदर्भात महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक गावात आरोग्य आणि कल्याण केंद्र उघडण्याच्या स्वप्नांच्या बरोबरीने काम करेल, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनीम्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनी शेजारील राज्यांमध्ये समुदाय आरोग्य सेवा अधिक चांगली आहे असे लोकांचे मत आहे, परंतु कर्नाटकातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे एक स्वप्न आहे.
राज्यात २३८० पीएचसी आहेत म्हणजेच ३० हजार लोकसंख्येवर एक प्राथमिक आरोग्य केंद्र. ही तफावत कमी करुन लोकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्याचे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. पीएचसीचे बेडची संख्या सध्याच्या सहा वरून १२ व त्यानंतर २० पर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. पीएचसीमध्ये आयुष आणि महिला चिकित्सकांसह तीन ते चार डॉक्टर असतील. पीएचसीमध्ये योग, लॅब, एक्स-रे आणि टेली मेडिसिनसारख्या सुविधा असतील.
डॉ सुधाकर यांनी चांगल्या राहण्याची सोय नसल्यामुळे बहुतेक डॉक्टर ग्रामीण भागात व पीएचसीमध्ये काम करण्यास नकार देतात. या समस्येवर विजय मिळविण्यासाठी आणि कोणत्याही वेळी कर्मचार्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पीएचसी प्रकल्पातर्फे फिजिशियन, परिचारिका आणि सहाय्यक नर्स दाईंसाठी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
प्रत्येक पीएससीमध्ये ई-हॉस्पिटलची सुविधा असेल जेणेकरुन डॉक्टर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकतील. सामुदायिक आरोग्य केंद्रेसुद्धा श्रेणीसुधारित केली जातील. तालुका व जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण केले जाईल. २००खाटांच्या जिल्हा रूग्णालयात बेडची संख्या ५०० वरून ७०० पर्यंत वाढवण्याची योजना आहे. सर्व जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाईल.
पूर्वी प्रति लाख लोकसंख्येमध्ये एक रुग्णवाहिका होती, आता प्रत्येक ३० हजार लोकसंख्येसाठी एक रुग्णवाहिका असेल. प्रत्येक पीएचसीकडे स्वतःची आधुनिक रुग्णवाहिका असेल.









