प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. त्यामुळे मध्यान्ह आहार योजनाही बंद पडली आहे. त्यामुळे सार्वजनिक शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 108 दिवसांचे आहार धान्य (तांदूळ, गहू, तूरडाळ) वितरण करण्याचा आदेश दिला आहे.
सार्वत्रिक सुटय़ा वगळता पाच महिन्यातील आहारधान्य पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जून आणि जुलै महिन्यातील 53 दिवसांचे धान्य देण्यात आले होते. आता दुसऱया टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यातील 55 दिवसांचे धान्य वितरीत केले जाणार आहे.
शिक्षण खात्याने केएफसीएससी संस्थेला जून आणि जुलै महिन्यातील धान्य वितरणाची सूचना केली होती. आता उर्वरित तीन महिन्यातील धान्य वितरण करण्याची सूचना देण्यात आली आहे.









