ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पाच मोठी कारागृह लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यामध्ये येरवडा, ऑर्थर रोड, भायखळा, ठाणे आणि कल्याण या कारागृहांचा समावेश आहे. राज्याचे कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. राज्यातील पाच मोठ्या कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे न्यायालयाने सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील विविध कारागृहांतून तब्बल तीन हजारांहून अधिक कैदी सोडण्यात आले आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह प्रशासनाने राज्यातील येरवडा, ऑर्थर रोड, भायखळा, ठाणे आणि कल्याण या पाच कारागृहांतही ‘लॉकडाउन’ केले आहे.








