मुंबई / ऑनलाईन टीम
सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही तासापूर्वी जाहीर केला आहे. तसंच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. दरम्यान राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही.
राज्य सरकारने नुकतंच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय शिक्षण विभागाकडून सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता १ जून रोजी CBSE कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.