ऑनलाईन टीम
देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ही माहिती दिली. राज्यातीतील कोरोना स्थिती सुधारल्यानंतर पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडले जातील, असंही राज्य निवडणूक आयोगने स्पष्ट केलं आहे.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधली पोटनिवडणुकसाठी मतदान होणार होते. मात्र कोरोनामुळे या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
पोटनिवडणुकीसााठी १९ जुलैला मतदान होणार होतं. मात्र ७ जुलैला राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी असलेली आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे.
Previous Articleसेल्फी काढताना दरीत पडलेल्या युवकास बाहेर काढण्यात यश
Next Article यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ








