प्रतिनिधी / पणजी
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ात घेतल्या जातील. सरकार व राज्य निवडणूक आयोग दरम्यान चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील पालिका निवडणुका मात्र पणजी महापालिका निवडणुकीबरोबरच फेब्रुवारीमध्ये घेतल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने अगोदर पालिका व जिल्हापंचायत निवडणुका एकाच वेळा घेण्याचा प्रयत्न चालू केला होता. मात्र नंतर सरकारने त्याचा नादच सोडून टाकला. पालिकांवर सध्या प्रशासक नियुक्त केलेले आहेत. व प्रशासंकांना 6 महिन्यापर्यंत रहाता येते. पाहिजे असल्यास नव्याने आध्यादेश जारी करुन प्रशासकांना मुदतवाढ देता येते. परंतु सरकारने पालिका निवडणुका पणजी मनपा निवडणुकीबरोबरच घेण्याचे ठरविले असल्याने या निवडणुका फेब्रुवारी अखेरीस होऊ शकतील.
जि.प. निवडणुकीसी 4 दिवस प्रचाराचे सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हापंचायत निवडणुका या साधारणतः 19 डिसेंबरनंतर व नाताळच्या अगोदर घेण्याचा सरकारचा इरादा आहे. प्रचारासाठी प्रत्यक्षात 3 ते 4 दिवसच दिले जातील व थेट मतदान व दुसऱयादिवशी मतमोजणी हाती घेतली जाईल, उत्तर गोव्यात 25 व दक्षिण गोव्यात 25 मतदार संघातून या निवडणुका होतील. सध्या दक्षिण गोव्यात विविध मुद्यांवर आंदोलने चालू असल्यानेच जि.प. निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.









