मुंबई \ ऑनलाईन टीम
कोविडसंदर्भात कोणतीही ढिलाई अतिधोकादायक ठरु शकते असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिथिलतेबाबत चर्चा करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी कोविड संपलेला नाही, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेत असतात. व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. व्यापाऱ्यांच्या भावना बरोबर आहेत. परंतू त्यांनी जर परिस्थितीची एकूण माहिती घेतली तर या परिस्थितीमध्ये कोविड संदर्भात कोणतीही ढिलाई अतिधोकादायक ठरु शकते. आज पुर्णतः कोरोना नियंत्रणात आला आहे परंतू संपला नसल्याचे सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे.
अमेरिकेत तिसरी लाट आली आहे. कोरोना म्युटंट वेगवेगळ्या पद्धतीने होतो आहे. कोरोना प्रादुर्भाव उद्या वाढला तर याची जबाबदारी सरकारवर येईल यामुळे सर्व खबरदारी घेऊन काम सुरु आहे. व्यापाऱ्यांना विनंती आहे की तुमचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. कारण जितका संपर्क अधिक होईल तितका जीवाला धोकाही अधिक आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करु, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








