ऑनलाईन टीम / पणजी
राज्यात आज सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी या सरींचे प्रमाण तुरळक होते. तर पर्वरीत हे प्रमाण मुसळधार होते. आज दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ पर्यंत ढगाळ वातावरण असले तरी १० नंतर मात्र आकाश निरभ्र होऊ लागले आहे.
सकाळच्या सुमारास मात्र राज्याच्या पर्वरी, पेडणे, म्हापसा, फोंडा, पणजी व इतर भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे कोणती ही जीवीत अथवा वित्त हाणी झालेली नाही. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा होता. मात्र थोड्याच वेळात निरभ्र आकाशामुळे वातावरण जैसे थे झाले आहे. हवामान विभागाने गेल्या एक ते दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्या प्रमाणे आज सकाळच्या सुमारास पावसाने कमी जास्त प्रमाणात पावसावसाने हजेरी लावली आहे.
असे असले तरी सद्या राज्यभर सुरु असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीला अडथळा येईल असा पाऊस राज्यातील कोणत्याच ठिकाणी झालेला नसल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरुच राहणार आहे.