प्रतिनिधी / नवारस्ता
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी घराघरात जाऊन प्रत्यक्ष माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये सुरु असलेला ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र या योजनेच्या अंमल बाजावणीकरिता राज्याचे गृहराज्यमंत्री स्वतः आपल्या मतदारसंघातील गावागावांत पोहचले असून घराघरात जाऊन ते या महत्वकांक्षी योजनेची माहिती देताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर घरातील प्रत्येक वयाच्या व्यक्तीच्या आरोग्याची सखोल चौकशी करून सरकारी यंत्रणा आपल्यापर्यंत पोहचते का ? कोविड संदर्भात काळजी घेते का ? शासनाच्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहतात का ? अशी माहिती घेऊन शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या ‘ असे भावनिक आवाहन करताना दिसत आहेत.
दरम्यान राज्याचे मंत्रीच थेट आपल्या घरात आल्यामुळे गावागावातील सर्वसामान्य नागरिकामधून राज्य शासनाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. तर प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे.
Previous Articleकोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविणे हे मोठे आव्हान
Next Article जम्मू काश्मीरमधील कोरोना रुग्णांची संख्या 58,244 वर









