प्रवीण झांटय़े यांचे प्रतिपादनअनेक बडे उद्योग गोव्यात येण्यासाठी उत्सुक
डिचोली/प्रतिनिधी
गोव्यातील बेरोजगारी आटोक्मयात आणण्यासाठी सरकारतर्फे लवकरात लवकर राज्याचे औद्योगिक धोरण अंमलात येणे गरजेचे आहे. आज गोव्यात उद्योग सुरू करण्यासाठी अनेक बडय़ा कंपन्या उत्सुक असून त्यांना या राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार समावून घेण्यासाठी सरकारने औद्योगिक धोरण लवकरात लवकर अंमलात आणणे गरजेचे आहे. तसेच सरकारकडे आज मोठय़ा प्रमाणात जागा असून त्या जागांवर या कंपन्या आल्या तर संबंधित भागाचा विकास मार्गी लागणार. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न बऱयाच अंशी सुटू शकणार. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मयेचे आमदार प्रवीण झांटय़? यांनी केले.
डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गोवा मूक्तीदिन सोहळा साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर मयेचे आमदार प्रवीण झांटय़? बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक, गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
गोवा मुक्तीची आज आम्ही 60 वर्षे साजरी करीत असताना जर आम्ह गोवा मुक्ती वर्षाचा काळ डोळय़ासमोर आणला तर लक्षात येईल की, त्यावेळी लोकांसमोर आजच्या प्रमाणे कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. तरीही राज्याच्या भुमिपूत्रां?नी गोव्यावरचे आपले प्रेम दाखवून दिले. त्यानंतर गोव्याला लाभलेले दुरदृष्टी असलेले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे हाताळताना या राज्याचे भाग्यच बदलून टाकले. त्यांच्या पाठोपाठ प्रतापसिंह राणे आणि स्व. मनोहर पर्रिकर यांच्यासारखे दुरदृष्टी असलेले नेतृत्व गोव्याला लाभले. तर विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्कृष्टपणे वाटचाल करीत आहे. सर्वच क्षेत्रात गोव्याचा आज विकास होताना आम्ही पाहत आहे. असेही आमदार प्रवीण झांटय़? यांनी पुढे म्हटले.
(ँर्दे) मयेच्या स्थलांतरित मालमत्तेविषयी लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी व्हावी.
मयेच्या स्थलांतरीत मालमत्तेचा विषय सोडविण्यासाठी भाजप सरकारने स्वतंत्र अस काया केला आहे. त्या कायद्यानुसार मयेचा सदर जटील विषय सोडविण्यासाठी सरकारदरबारी जोरदार कार्य सुरू आहे. तसेच संबंधित अधिकाऱयांच्या काहीच दिवसांपूर्वी बैठका घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याविषयी पूर्णपणे लक्ष घातले असून कायद्याची अंमलबजावणी करीत लवकरात लवकर हा विषय निकालात आणताना उर्वरित सर्व मयेतील भुमीपुत्रांना सनदी देण्यात याव्यात अशी सुचना करण्यात आली आहे. त्यासाठी पुन्हा एक बैठक होणार असल्याचे यावेळी आमदार प्रवीण झांटय़? यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी आपल्या स्वागातभर भाषणात, 441 वर्षांच्या जुलमी राजवटीत गोव्यातील तत्कालीन भुमीपुत्रांनी अने हाल अपेष्टा सहन केल्या. त्यानंतर 18 जून 1961 साली राज्यात प्रथम क्रांती घडली आणि या जुलमी रजवटीविरोधात लढा उभा राहिला. य लढय़ात पोर्तुगीज राजवटीला नेस्तनाबूत करीत 19 डिसेंबर 1961 साली गोव्याला मुक्ती मिळाली. त्यानंतरच्या स्वतंत्र गोव्याने सर्वच क्षेत्रात मोठी आघाडी मिळविली आहे. पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी या राज्याच्या विकासाची दारे खुली केली. त्यानंतर राज्याची सर्वच क्षेत्रात प्रगती होत गेली. आज संपूर्ण जगावर आलेल्या कोवीड महामारीमुळे मोठी संकटे निर्माण झाली आहे. त्यातूनही बाहेर पडण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी निवृत्त सरकारी अधिकारी महादेव परब यांनी गोव्यावर आणि कोरोनावर एक कविता सादर केली. सूत्रसंचालन दत्तात्रय परब यांनी केले व आभार मानले.









