ऑनलाईन टीम
राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून या पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. शिवाय ६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली आहे. तर, बिसजित डमरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली आहे. यामध्ये तामिळनाडूतही दोन जागेवर निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या मते, तामिळनाडूतील राज्यसभेची जागा या वर्षी ७ मे २०२१ रोजी IADMK नेते केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे, ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









