प्रतिनिधी / नवी दिल्ली
राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. त्यांचा मुलगा कुशन मित्रा यांनीही माहिती दिली आहे. मित्रा हे २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून २०१० मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपाकडून राज्यसभेत निवडून आले होते. ते २०१६ पर्यंत राज्यसभेचे खासदार ही होते. त्यांनी मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक ही महत्त्वाची पदे ही भुषवली आहेत.
मित्रा हे लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्ती होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे पक्षाचा कारभार सरकल्यानंतर न कळत मित्रा दुर गेले असल्याचे म्हटले जातं. जुलै २०१८ मध्ये मित्रा यांनी भाजपचा राजीनामा देत. ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.
मित्रा यांची निधन वार्ता समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये मोदी यांनी “चंदन मित्रा जी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अंतर्दृष्टीमुळे कायम स्मरणात राहतील. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.