मुंबई \ ऑनलाईन टीम
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. तसंच, त्यांनी तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट असल्याचं म्हटलं आहे. गेले चार ते पाच दिवस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








