तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि माझा कायम संपर्क असतो. मी त्यांचा लाडका मंत्री असल्याने मला कोणतीच अडचण येत नाही. आठच दिवसांपूर्वी आपण त्यांच्याशी चर्चा करून आलो आहे. बाहेर काही राजकीय गोष्टी होत असतील मात्र आपणास कुलपती म्हणून त्यांना भेटावे लागतेच आणि त्यांच्यासोबत काम करावे लागते असे सांगत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असे असतानाच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना ” मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे,कामे करताना मला येत नाही “असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान सर्वांसाठी सामान नियम असून त्यानुसारच प्रत्येकाने वागायला हवे असे सांगत राज्यपालांनी विमान नाकारले ,पण त्यांनीसुद्धा नियमांचे पालन करायला हवे होते असा टोला सामंत यांनी राज्यपालांना लगावला आहे. आमच्या विधान परिषदेच्या १२ आमदारांची फाईल राज्यपालांकडे पडून असून त्यांनी त्याला लवकर मंजुरी द्यावी असेही उदय सामंत म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









