प्रतिनिधी / बेळगाव
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतियेच्या शुभ मुहूर्तावर सर्व मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये जोतिबाची राजेशाही पोशाखात विशेष पूजा करण्यात आली होती. यावेळी सकाळी 8 वाजता देवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 12 वाजता धुपारती करण्यात आली. अक्षय्य तृतियेनिमित्त देवाला आमरसाचा नैवेद्य, कलिंगड, पपई आणि अननस या फळांचाही नैवेद्य दाखविण्यात आला.









