शहरात येण्यासाठी वाहनधारकांना घालावा लागतो वळसा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध चौकात होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र ही सुविधा बंद ठेवून बॅरिकेड्स लावून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रकार रहदारी पोलीस प्रशासनाने चालविला आहे. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे समादेवी गल्लीत येणारा रस्ता वाहनधारकांसाठी बंद झाला आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी नागरिकांना वळसा घालून यावे लागत आहे.
शहराची वाटचाल समार्ट सिटीकडे होत असताना वाहनधारकांसाठी मात्र गैरसोयिचे ठरत आहे. विविध चौकात होणारी वाहतुक कोंडी सुरळीत करण्यास रहदारी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. होणारी वाहतुक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकात ट्राफिक सिग्नल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र ही ट्राफिक सिग्नल सुविधा कार्यान्वित झाली नसल्याने राजेंद्रप्रसाद चौक, धर्मवीर संभाजी चौक, गोगटे चौक, आरपीडी सर्कल, आदि ठिकाणी वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी रहदारी पोलीसाची नियुक्ती करून वाहतुक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे. पण रहदारी पोलीसांची नियुक्ती केवळ दंडात्मक कारवाईसाठी करण्यात येत असल्याने चौकात रहदारी पोलीस नसतात. त्यामुळे या चौकात वाहतुक कोंडी होत आहे. राजेंद्रप्रसाद चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. शहराच्या पश्चिम भागातील नागरिक बेळगाव – वेंगुर्ला मार्गाने शहरात प्रवेश करीत असतात. त्यामुळे हा रस्ता आणि राजेंद्र प्रसाद चौक वर्दळीचे बनले आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद चौकात रहदारी पोलीसाची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. पण या ठिकाणी रहदारी पोलीसांची नियुक्ती करण्या ऐवजी बॅरिकेडिंग करून वाहनधारकांसाठी रस्ता बंद करण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱया वाहनधारकांची गैरसोय होत आहे. राजेंद प्रसाद चौकात होणाऱया वाहतुक कोंडीवर नियंत्रण करण्यास रहदारी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. हे अपयश लपविण्यासाठी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्याचा पर्याय राबविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर चौकात रहदारी पोलीसांची नियुक्ती करून रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. समादेवी गल्लीत तसेच किर्लोस्कर रोडला जाण्यासाठी पश्चिम भागातून येणाऱया वाहनधारकांना लिंगराज कॉलेज समोरून वळसा घालुन जावे लागत आहे. तसेच शहरातून पश्चिम भागातील गावांना जाण्यासाठी तसेच राणी चन्नम्मा चौकाकडे जाण्यासाठी वाहनधारकांना धर्मवीर संभाजी चौकात वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे वाहनधारकांसाठी तापदायक ठरत आहे. येथील बॅरिकेड्समुळे काकेत कळसा आणि गावाला वळसा अशी स्थिती वाहनधारकांची बनली आहे. त्यामुळे रहदारी पोलीस विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी या प्रकरणी लक्ष घालून राजेंद्र प्रसाद चौकातील बॅरिकेड्स हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे.









