शिमला राजभवनात होणार सोहळा
प्रतिनिधी /पणजी
हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले राजेंद्र आर्लेकर उद्या दि. 13 जुलै रोजी आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. शिमला येथील राजभवनात दरबार सभागृहातील कीर्ती कक्षात सकाळी 10 वाजता हा सोहळा होणार आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, सहकारी मंत्री, घटनात्मक संस्थांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हिमाचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर्लेकरांना शपथ देणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के कार्यकर्ते, प्रखर राष्ट्रवादी, आणि सर्वांशी सौहार्दाचे संबंध असलेले, भाजपचे आमदार, मंत्री तसेच माजी सभापती अशी पदे भूषविलेले अगदी सामान्यातील सामान्य असे हे व्यक्तीमत्व आता राज्यपाल सारख्या राज्याच्या सर्वोच्चपदी पोहोचले आहे.









