प्रतिनिधी / सांगली
राज्याचे सहकारमंत्रीच जर कायदा मोडत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे ‘चलो कराड’ म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेली आंदोलनाची हाक मोडून काढण्यासाठी पोलीससरसावले आहेत. मसूर येथे अनेक आंदोलकांना पोलीसांनी अडवले आहे तर कराड पोलीसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे.
सह्याद्री साखर कारखान्यावर आज एक रकमी एफ.आर.पी साठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी सुरु आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्याचे साखर कारखानेच एकरकमी एफ आर पी देत नाहीत व उस तोडीसाठी सर्वत्र संघटीत गुन्हेगारी सुरु आहे. टोळ्या एकरी रक्कम ठरवून मगच तोड सुरु करत शेतकऱ्यांना लुटत आहेत.









