मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद अद्याप मिटलेला नाही. राज्य सरकार वारंवार मागणी करूनही राज्यपाल याची दखल घेत नाहीत. त्यामुळे जवळपास १० महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर नियुक्तीबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली. तर दुरीकडे राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण असल्याचं बोललं जात आहे.
सरकारने दिलेल्या विधान परिषदेच्या १२ आमदारांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव आहे. त्यांना राष्ट्रवादी कोट्यातून आमदारकी देण्याचं ठरलं होतं. पण आता शेट्टी यांच्या नियुक्तीवर आक्षेप असल्याची चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांना याविषयी विचारलं असता पराभूत व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, तथ्य तपासल्यानंतर अडचण आली तर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले. “निवडणुकीमध्ये जर एखादी व्यक्ती पराभूत झालेली असेल तर त्यांची नियुक्ती केली जात नाही. त्यामुळे कोणाला नेमलं जातं त्यासंदर्भात माहिती पुढे आलेली आहे. त्या महितीमध्ये तथ्य आहे की नाही त्याची शहानिशा आम्ही करत आहोत. जर काही त्यात अडचम आली तर नावाच्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं अजित पवार म्हणाले.