ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्त देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. यावर्षी काँग्रेसने राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जाहिरात प्रसिद्ध केली नसून या जाहिरातीसाठी येणारा खर्च कोरोना महामारी संकटात सापडलेल्या श्रमिकांसाठी मदतीच्या रूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात काँग्रेसकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आज माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व भारतीयांनी त्यांची आठवण काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सद्या देश कोरोना संकटात सापडला आहे. त्यामुळे
या वर्षी काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, या वर्षी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जाहिरात देण्या ऐवजी जाहिरातीसाठी येणारा सर्व खर्च मजूर आणि कामगारांच्या मदतीसाठी उपयोगात आणला जाईल. तसेच देशातील सर्व काँग्रेस अनुयायांनी या प्रेरणा दिवशी गरजवंतांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण एक भावनिक ट्विट केले आहे. ‘एक सच्चा देशभक्त, उदार आणि परोपकारी वडिलांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी देशाला प्रगतीच्या अग्रस्थानी आणले होते’, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.









