वार्ताहर / राजापूर
राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगणाचे सुशोभिकरणाचे काम सुरू असतानाच हे ठिकाण मद्यपींचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी दारूच्या पार्ट्या होत असून दारूच्या बाटल्या, ग्लास, खाद्यपदार्थांच्या पिशव्या त्याच ठिकाणी टाकल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील वरचीपेठ येथे असलेल्या राजीव गांधी किडांगणाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 22 लाख 36 हजार रूपये खर्च करून याठिकाणी बहुउद्देशीय इमारत तसेच नागरीकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, नदीकिनाऱ्यालगत असलेल्या झाडांभोवती बसण्यासाठी बैठक व्यवस्था अशा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. सध्या हे काम पगतीपथावर आहे. या कामामुळे एकीकडे या कीडांगणाच्या सौंदर्यात भर पडत असताना दुसऱ्या बाजूला मद्यपी कीडांगणाचे सौंदर्य बिघडविण्याचे काम करत आहेत.
रात्रीच्या वेळी कीडांगण परिसरात असलेल्या अंधाराचा फायदा घेत मद्यपींनी दारू पिण्यासाठी येथील बैठक व्यवस्थेचा वापर करत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी याठिकाणी दारूच्या पार्ट्या होत असल्याचे बोलले जात आहे. मद्यपींकडून दारूच्या व पाण्याच्या रिकामी बाटल्या, प्लास्टीकची ग्लास, खाद्यपदार्थाची वेस्टने, पिशव्या त्याच ठिकाणी टाकल्या जात आहेत. या क्रीडांगणावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे क्रीडांगणावर असे चित्र पाहिल्यानंतर नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी रात्रीची गस्त घालून अशापकारे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱया व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नगरपरिषदेनेही अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उपाय-योजना करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.









