बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे माजी पर्यटन मंत्री सी. टी. रवि यांनी राज्यपालांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर नवीन भाजप संघटनेत आपली नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या सूचनेवरून राज्यपाल वजुभाई वाला यांनी रवि यांचा राजीनामा स्वीकारला. राजीनामा स्वीकारल्यानंतर माजी मंत्री रवि यांनी दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
रवि यांची भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पडताना ते आता ते आपला सर्व वेळ पक्षाच्या कार्यात घालवतील. आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या जाणून घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवि यांना पाच राज्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे.