वार्ताहर/कसबा बावडा
जिल्हय़ात सकाळपासून धुव्वाधार सुरु असून धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरु झाल्याने राधानगरीसह वारणा, कुंभी, कडवी धरणातील पाणीसाठयात वाढ झाली आहे. यामुळे धरणातून सरासरी १२०० क्युसेक विसर्ग सुरु केला आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणीपातळी झपाटय़ाने वाढ झाल्याने कसबा बावडा राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे बावडा वहातूक बंद झाली आहे. सध्या सतत सुरु झालेल्या पावसाने पंचगंगा पाणीपातळीत वाढ होत असुन बंधारा क्षेत्रात १८ फुटपाणी पातळी गाठली आहे/
राजारामबधाऱ्यावरुण वडणगे, निगवे, कुशीरे, पोहाळे, भुये, भुयेवाडी, जठार वाडी, केली येथील शेतकरी, कामगार, नागरीक, शाहु मार्केट यार्ड, शिरोली, एम.आय.डी.सी, औद्योगीक वसाह्तीकडे जाण्या येण्यासाठी कसबा बावडा मार्ग जवळचा आसलेमुळे रात्र दिवस या राजारामबंधाऱ्यावरून वहातूक सुरु असते. आता ही वहातूक शिवाजी फुलमार्गे सुरु आहे.
पंचगंगा पाण्याची पातळी पात्रातूनच वहात आहे. उद्या पर्यंत पाणीपात्राच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठाच्या रानात पाणी शिरण्या अगोदर गवत कापणीची लगबग सुरु आहे.