राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र 1346 सभासदांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. अपात्र सभासदांना बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर विभागाने दोन महिन्यांचा कालावधी द्यावा, यानंतरच पुढील तीन महिन्यात अपात्रतेवर निर्णय घेण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व्ही. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाने महाडिक मोठा दिलासा मिळाला आहे.
बोगस व कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरच्या 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला होता. या निर्णयाचा सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून एकूण 1 हजार 899 हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन 484 सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे 69 वगळून अपात्र 1008 व कार्य क्षेत्राबाहेरील 338 अशा 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते.
Previous Articleपाठीमागून साडी फोल्ड होतेय? या टिप्स फॉलो करा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.