राजापूर / प्रतिनिधी
राजापूर जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. साडेपाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. आज उशिरा ही कारवाई करण्यात आली.
रुग्णवाहिका चालकाचा एक महिन्याचा पगार आणि हजेरी बुक पाठवण्यासाठी डॉक्टरने लाच मागितली होती. याबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर लाच लुचपत विभागाने कारवाई केली. डॉक्टर रंगेहाथ सापडला असून डॉक्टरला अटक करण्याची कारवाई सुरू आहे.
Previous Articleसांगली जिल्ह्यात 924 कोरोनामुक्त, 697 नवे रूग्ण, 28 बळी
Next Article तासगावात एकाच दिवशी 70 जण कोरोनामुक्त









