राजापूर / प्रतिनिधी
राजापूर (Rajapur) तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरींचे सत्र सुरू असताना मंगळवारी राजापूर शहरात झालेल्या घरफोडीची तक्रार करूनही दखलह न घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
राजापूर शहराच्या सिमेवर असलेल्या चापडेवाडी येथील भालचंद्र नाचणेकर यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दुसऱ्यादिवशी ही घटना उघडकीला आल्यावर राजापूर पोलिस स्थानकात याबाबत माहिती देऊन लेखी अर्ज दिला. मात्र तक्रार अर्ज देउनही राजापूर पोलिसांनी या घटनेची साधी चोकशीही केली नाही.
राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीची घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून राजापूर पोलीस स्थानकासमोरून दिवसा ढवळ्या दुचाकीची चोरी झाली. आता तर शहरालगत घरफोडीची घटना घडलेली असताना त्याची दखलही पोलिसांनी घेतलेली नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळे
चोरट्यांचा आत्मविश्वास वाढण्यास भिती व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









