विवेक गुरव, विनोद गादीकर यांचा उपक्रम
वार्ताहर/ राजापूर
राजापूरातील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे शहरअध्यक्ष विवेक उर्फ पिंटय़ा गुरव आणि सनातन संस्थेचे विनोद गादिकर यांच्या संकल्पनेतून समस्त राजापूरवासीयांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने एक दिवा जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱया जवानांप्रती कृतज्ञता म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर जाऊन जवानांसाठी दिवाळी साजरी केली. तसेच एक दिवा जवानांसाठी हा उपक्रम राबविण्याचे आवाहन संपूर्ण देशवासीयांना केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा शहर अध्यक्ष विवेक गुरव यांनी राजापूर शहरात हा उपक्रम राबविला. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते महादेव गोठणकर, सीताराम गुरव, निवृत्त शिक्षक यशवंत गुरव, दिलीप गोखले, हर्षद गुरव, तेजस गुरव, वैष्णवी गादिकर, महेंद्र लेले, महेश गुरव, राजेंद्र गुरव, प्रज्वल गुरव, शामकांत वेरेकर, तेजल वेरेकर, सौरभ गुरव, सौ.लेले, सौ.प्रतीक्षा गुरव, सौ.विद्या गुरव यांच्यासह ओमकार मित्र मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.









