गोडोली / प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य कर्तव्य पार पडण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी केलेल्या तक्रारीवरुन त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ नुसार विभागीय आयुक्त यांनी अपात्रतेची कारवाई केले आहे.
खटाव तालुक्यातील राजापूर येथील गायरान गटनंबर १७३२ मधील तुकाराम आनंदराव घनवट यांनी गुराचा गोठा हे अतिक्रमण केले असून सदरचे अतिक्रमण काढणे बाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी खटाव गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या चौकशीत सदरची तक्रारीत तत्थ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून सरपंच,उपसरपंच , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना त्यांचे पदावरून ( अपात्र ) काढून टाकण्याचे बाबत तक्रार केली.
खटाव गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचे अतिक्रमण काढणे बाबत ग्रामपंचायतीस वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरी ही ग्रामपंचायतीने सदरचे अतिक्रमण काढलेले नाही. गायरान गट नंबर १७३२ मध्ये घनवट यांनी काढण्यात आलेला उकिरडा तुकाराम आनंदराव घनवट यांनी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी उकिरडा व वैरणीची गंज लावलेली आहे.
ग्रामपंचायत ताब्यातील शासनाच्या जागेतील ग.नं.१७३२ मध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण असल्याचे कळवले नुसार सर्व अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी आदेश करूनही सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच,उपसरपंच , सर्व सदस्य टाळाटाळ करत असले बाबत व अतिक्रमण करण्यासाठी पाठबळ देत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी राजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना त्यांचे पदावरून (अपात्र) काढून टाकण्याचे आदेश केले आहे. कायदेशीर मार्गाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे मत अशोक लिपारे यांनी तरुण भारत शी बोलताना व्यक्त केले.