वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील उपचार घेत असलेला अखेरचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सोमवारी घरी परतल्याने राजापूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शून्य कोरोना रूग्ण असलेला राजापूर तालुका हा पहिला तालुका ठरला आहे. तालुका कोरोनामुक्त झाल्याने पशासनासह तालुकावासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरूवातीच्या काळात जवळपास दिड ते दोन महिने कोरोना पादुर्भावापासून दूर राहिलेल्या राजापूर तालुक्यात 16 मे रोजी पहिला कोरोना पाŸझिटीव्ह रूग्ण सापडला. त्यानंतर सातत्याने रूग्ण सापडत होते. गेल्या पाच महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तब्बल 328 वर पोहोचली होती. या पैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आŸक्टोबर महिन्यामध्ये तालुक्यातील कोरोना रूग्णवाढीचा वेग मंदावला आणि सद्यस्थिती तालुक्यात एकही अŸक्टीव रूग्ण राहिलेला आहे.
328 रूग्णांपैकी आता 313 जण उपचारांती पुर्णपणे बरे झाल्याने तालुका कोरोनामुक्त झाला आहे. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत पातळीवर काम करणारी ग्रामकृती दले, आशा स्वयंसेविका, स्थानिक पातळीवर काम करणाऱया स्वंयसेवी संस्था आणि त्यांच्या जोडीला राजापुरातील जनतेने घेतलेली खबदारी यामुळे राजापूर तालुका आता शून्य रूग्ण संख्येवर आला आहे.
Previous Articleऔरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर
Next Article वाडा भराडे शाळेत पोषण आहार वाटपात गोंधळ









