ऑनलाईन टीम / भरतपूर
सामान्यांना न्यायासाठी अंतिम व्यवस्था म्हणुन न्यायालयाकडे पाहीले जाते. मात्र राजस्थान येथील भरतपूरमध्ये एका न्यायमूर्तीवरच अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे ऐकुन उच्च न्यायालयही चक्रावून गेले आहे. या प्रकरणी निलंबित केले आहे.
जितेंद्र सिंह गोलिया असे संशयित आरोप झालेल्या न्यायाधीशाचे नाव असुन गोलिया हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश होते. याप्रकरणी एका महिलेने मथुरा गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राथमिक चौकशी आणि विभागीय चौकशीचा विचार होईपर्यंत राजस्थान उच्च न्यायालयाने रविवारी त्याला तत्काळ निलंबित केले आहे.
न्यायाधीश गोलीया यांच्यावर गेल्या महिन्याभरापासुन तक्रदार महिलेच्या मुलाशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. गोलिया आणि दोन्ही कर्मचार्यांनी मुलाला याबाबत कोणालाही सांगू नको, अशी धमकी दिली होती. अंशुल सोनी आणि राहुल कटारा अशी आणखी दोन आरोपींची नावे आहेत. यामध्ये अंशुल सोनी हे न्यायाधीशांचे स्टेनोग्राफर असून राहुल कटारा हेही न्यायाधीशांच्या कर्मचाऱ्यांमध्ये होते. एके दिवशी न्यायाधीश आपल्या मुलाला सोडण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांनी मुलाचे चुंबन घेतले. हा सर्व प्रकार मुलाच्या आईने पाहिला. तेव्हा आई घाबरली तेव्हा तिने मुलाची विचारपूस केली, त्यानंतर मुलाने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.








