ऑनलाईन टीम / जयपूर
राजस्थानमध्ये मागील चोवीस तासात 122 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 5 हजार 629 वर पोहचली आहे. तर जयपूर जिल्ह्यात आणखी 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, काल कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण 139 जणांनी आपले जीव गमावले आहेत. यामध्येे जयपुर मध्ये सर्वाधिक म्हणजे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 10 जणांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे.









