ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 833 इतकी झाली आहे. तर सकाळपर्यंत 608 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत राजस्थानमधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 56 हजार 708 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11 मृतांमध्ये भरतपूरमधील 3, बिकानेर 1, गंगानगर 2, जयपूर 3 आणि उदयपुरमधील दोन जणांचा समावेश आहे. आज 171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 41 हजार 819 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राज्यात 14 ,056 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अलवार मधील 73 बारमेर 32, बिकानेर 78 चितोरगर 33, दऊसा 7, गंगानगर 6, हनुमानगर 20, जयपूर 59, जलोरे 14, कोटा 100, नागौर 8, पाली 34, सिकार 91 आणि उदयपूर मधील 53 जणांचा समावेश आहे.









