जयपूर
कोरोना काळात राजस्थानात नव्या संकटाने झोप उडविली आहे. राज्याच्या विविध जिल्हय़ांमध्ये मागील 8 दिवसांपासून कावळय़ांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सातत्याने कावळय़ांचा मृत्यू होत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. तर राज्य सरकार यासंबंधी सतर्क झाले आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूचा वाढता धोका पाहता यासंबंधी तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
हाडौती क्षेत्रात बर्ड फ्ल्यूमुळे 100 हून अधिक कावळय़ांचा मृत्यू झाला आहे. तर झालावाड जिल्हय़ात सुमारे 93 कावळय़ांचा मृत्यू ओढवला आहे. कोटा जिल्हय़ाच्या रामगंजमंडीमध्ये 8 कावळय़ांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचा संशय आहे. तर बारां येथील मथना गावात शोधमोहिमेदरम्यान आणखीन 19 कावळे मृत आढळून आले आहेत.