ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शनिवारी 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 776 इतकी झाली आहे. त्याबरोबरच 499 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत राजस्थानमधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 50 हजार 656 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल झालेल्या 9 मृतांमध्ये बिकानेरमधील 1, जयपूर 1, बारण 3, कोटा 3 आणि उदयपुरमधील एकाचा समावेश आहे. शनिवारी 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 16 लाख 73 हजार 314 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राज्यात 13,570 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अजमेर 46, अलवार 91, बनसारा 25, बारमेर 27, बिकानेर 2, डुंगरपूर 18, जयपूर 42, झलवार 11, झुंझूंन 19, कोटा 85, नागौर 52, सिकार 26, टोंक 7 आणि उदयपूर मधील 47 जणांचा समावेश आहे.









