नवी दिल्ली
टाटा पॉवर सोलरने राजस्थानातील जेटस्टारमध्ये 160 मेगावॅट क्षमता असणाऱया प्रकल्पाची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. उपलब्ध माहितीनुसार सदरच्या प्रकल्पामध्ये जवळपास 6,75,000 मोनोक्रिस्टलाईन पीव्ही मॉडय़ूलचा वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पामधून वर्षाकाठी 3,87,00,0000 युनिट विजेची निर्मिती होणार असल्याची शक्यता यावेळी व्यक्त केली आहे.
राजस्थानातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार
जेटस्टार प्रकल्प हा जवळपास मागील 15 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला असून हा प्रकल्प राज्यस्थानातील सर्वात मोठा सौर प्रकल्पांपैकी एक राहणार असल्याची माहिती आहे.








