ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शुक्रवारी पाच आणखी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 435 इतकी झाली आहे. त्याबरोबरच 123 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत राजस्थानमधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 18 हजार 785 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या 5 मृतांमध्ये अजमेरमधील 1, धोलपुर 2, डोंगरपुर 1 आणि सिरोही मधील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 125 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये जयपुरमधील 163, जोधपूरमध्ये 53, भरतपूरमध्ये 37, कोटा 23, अजमेर 19, बिकानेर 15 आणि नागौर मधील 12 जण जणांचा समावेश आहे. तर अन्य राज्यातील 28 जणांचा देखील मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सध्या राज्यात 3307 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.