ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये एका दिवसात 145 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 7 हजार 173 वर पोहचली आहे. यामध्ये 3150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 145 नव्या रुग्णांमध्ये अलवार मध्ये 5, बारमेरमध्ये 5, भीलवाडा, डुंगरपुर मध्ये प्रत्येकी एक, जयपूर 12, जलोरे 4, ज्योधपुर 17, कोटा 7, पाली 50, राजसमंद मध्ये 2, सवाई माधवपुर मधील 1, सीकर 30, शिरोही मधील 9 आणि उदयपूर मधील एक रुग्णांचा समावेश आहे.
राजस्थान मध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 163 वर पोहोचली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या जयपुर मध्ये आहे. कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे.









