ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचे मंगळवारी लागलेले निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागले. येथील जिल्हा परिषदेच्या ३१ मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २५ ठिकाणी विजय मिळवला. तर पंचायत समित्यांच्या १६९ वॉर्डपैकी ११० वॉर्डमध्ये विजय मिळवला. जिल्ह्यातील ९ पैकी आठ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने निर्विवाद विजय मिळवला. या निकालांमधून मतदार हा भाजपावर किती नाराज आहे हे दिसून आले. तसेच या निकालांमुळे भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.









