अबु धाबी
बेन स्टोक्सचे (60 चेंडूत नाबाद 107) झंझावाती शतक व संजू सॅमसनसमवेत (31 चेंडूत नाबाद 54) तिसऱया गडय़ासाठी साकारलेल्या 152 धावांच्या अभेद्य भागादारीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून अक्षरशः धुव्वा उडवला. वास्तविक मुंबईने 20 षटकात 5 बाद 195 धावांचा डोंगर रचला. त्यात हार्दिक पंडय़ा (21 चेंडूत 2 चौकार 7 षटकारांसह नाबाद 60) सुर्यकुमार यादव (40) यांची फटकेबाजी निर्णायक ठरली होती. पण त्यानंतर स्टोक्स व संजू सॅमसन यांनी त्यापेक्षाही मोठा धमाका साकारत रोमांचक विजय साकारला. राजस्थानने 196 धावांचे लक्ष्य केवळ 18.2 षटकातच गाठले. स्टोक्सने 14 चौकार व 3 षटकार तर सॅमसनने 4 चौकार 3 षटकार फटकावले.









