प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात कृषी, सहकार,औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा,कला,शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केले असून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेणे गरजेचे आहे ,त्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया असे आवाहन कुंभी कासारीचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कुडित्रे ता. करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नरके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन उत्तम वरुटे होते.
माजी आमदार नरके यांनी देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी चिनी वस्तूवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा सर्वांनी संकल्प करावा आणि त्याची सुरुवात आपल्यापासून करावी असे सांगितले.देशाच्या सीमेवर सैनिक प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे सुरक्षा करीत असल्याने देश सुरक्षित असल्याचे ते म्हणाले.सध्या कोरोनाच्या संकटात सर्वांनी प्रशासनाला साथ देऊन या संकटातून देशाला वाचवणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.स्वतःचे रक्षण स्वतः करावे आणि शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला संचालक अँड. बाजीराव शेलार, विलास पाटील,अनिल पाटील, संजय पाटील ,आनंदा पाटील, निवास वातकर, दादासाहेब लाड,किशोर पाटील, जयसिंग पाटील – यवलुज, जयसिंग पाटील -ठाणे, भगवान पाटील, आबा पाटील, पी.के.पाटील, प्रकाश दौलु पाटील, पी.डी.पाटील, दिलीप गोसावी, आनंदराव माने, वाय.एम.कांबळे,सौ.अनिता पाटील, सौ.माधुरी पाटील, कार्यकारी संच