रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जलनीती नुसार धरणाच्या पुढील बाजूस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्याला सतावणारा महापुराचा धोका टळू शकतो या मुळे महापूर थोड्या प्रमाणात येईल पण तो जास्त दिवस मुक्काम करणार नाही याला राजर्षी शाहू जलसंचय आणि वितरण योजना असे नाव द्यावे अशी माहिती. महापूर आणि जलनेतीचे अभ्यासक व श्री गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण काका जोशी यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली.
आपल्या कोल्हापूर संस्थानचा विचार करून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी विशिष्ट जलनेती आखून राधानगरी धरण बांधले यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी पाण्याचा प्रश्न मिटला केवळ धरण न बांधता जिल्ह्यातील संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी राधानगरी धरणापासून ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत अर्थात नदीतील राजापूर गावाजवळील कृष्णा नदीत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला. राधानगरी धरणापासून ते राजापूर बंधारा पर्यंत राजर्षी शाहू महाराजांनी खास जलनीती द्वारे कोल्हापूर पद्धतीचे बत्तीस बंधारे बांधण्याचे नियोजन केले होते यातील शेवटचा बंधारा 1985 साली शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे बांधण्यात आला.
पंचगंगा नदीवर ठराविक अंतरावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यामुळे त्या त्या भागात कधीच पाण्याचा तुटवडा जाणवला नाही किंबहुना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कधीच दुष्काळाचे सावट देखील आले नाही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे शेती पिण्याचे पाणी औद्योगिकीकरणाला लागणारे पाणी याचा कायमचा प्रश्न सुटला आणि या बंधाऱ्यामुळे कधी मोठ्याप्रमाणात महापूर आला नाही किंवा जरी महापूर आला तरी त्याचे पाणी फार दिवस थांबले नाही हे गेल्या अनेक वर्षातील चित्र आहे.
सन 2005 पासून कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका वाढला याला कर्नाटकातील अलमट्टी धरण असेल किंवा मांजरी पुलाचा भराव, हिप्पर्गी बॅरेज चा भराव अशी अनेक कारणे असतील सर्वांना समान पाणी मिळाले पाहिजे हा जीवनाचा हक्क आहे पण या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास बरेच धोके टळू शकतात.
ज्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांनी भविष्याचा विचार करून आपल्या जनतेला महापूर असो वा दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे नियोजन आखले याचप्रमाणे सध्या कोणत्या कारणाने महापूर येतो हे शोधण्यापेक्षा त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या जलनेती प्रमाणे कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पुढील बाजूस सरासरी1 हजार 300 ते 1 हजार400 मीटर अंतरावर कोल्हापूर पद्धतीचे लहान-मोठे बंधारे बांधल्यास कर्नाटकातील अनेक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल शिवाय अलमट्टी धरणाच्या पुढील बाजूस बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा केल्यास त्या त्या भागातील जलसिंचन शेती औद्योगिकीकरणाचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल व अलमट्टी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्याची कर्नाटक शासनाला जोखीम पत्करावी लागणार नाही अर्थात हा दोन राज्यांचा प्रश्न असल्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून दरवर्षी कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणारा महापुराचा प्रश्न मार्गी लागू शकतो किंबहुना पूर आला तरी तू फार दिवस न थांबता त्या पाण्याचे वितरण होऊन येथील महापुरानंतर चे प्रश्न ही सुटतील.
महापुराचा प्रश्न सोडवणे हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यातील सरकारची जबाबदारी असली तरी हा प्रश्न दोन राज्यांच्या कुवतीच्या बाहेर असल्याने केंद्र सरकारने याचा विचार करून यात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे म्हणजे ही योजना राजर्षी शाहू जलसंचय आणि वितरण योजना म्हणून कार्यान्वित केल्यास महापुराचे अनेक प्रश्न सुटू शकतात. याबाबत अरुण काका जोशी यांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे महाराज आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार धनंजय महाडिकयांच्याशी संपर्क साधला असून या योजनेबाबत त्यांना माहिती दिली आहे.
Previous Articleआयकर विवरणपत्र भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Next Article सातारा : कोरोनाच्या सावटाखाली बेंदूर साधेपणाने साजरा








